Gautami Patil : गौतमी पाटील यांचा ‘तो’ एक व्हिडिओ आणि पोलिसांत तक्रार दाखल; काय आहे नेमकं प्रकरण?

Gautami Patil : गौतमी पाटील यांचा ‘तो’ एक व्हिडिओ आणि पोलिसांत तक्रार दाखल; काय आहे नेमकं प्रकरण?

ठाणे : लोकप्रिय डान्सर गौतमी पाटीलविरोधात ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नुकताच दहीहंडीचा सण साजरा करण्यात आला. यावेळी राज्यात विविध मंचांवर गौतमी पाटीलसह इतरही नृत्यांगनांचे सादरीकरण हे वादात सापडले. नेटकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर आक्षेप घेतलेला पाहायला मिळाला. या सर्व प्रकाराला आता गंभीर वळण आहे. गौतमीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार भाजपच्या नरगसेविका मृणाल पेंडसे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओही पोलिसांकडे देण्यात आला आहे. अशा प्रकारच्या नृत्यामुळे सामाजिक जीवनात विकृती वाढत असल्याचा दावा करत मृणाल यांनी कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये त्यांनी स्पष्ट केलं की ही तक्रार कोणत्याही राजकीय विरोधातून करत नसून एक महिला म्हणून दाखल करत आहे. दरम्यान, ठाणे पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी त्यांचे म्हणणं सविस्तरपणे मांडले आहे.

हेही वाचा : Reel साठी 30 फूट उंचीवरून धरणात उडी…, पण पाण्याचा अंदाज चुकला…, अंगलट आला जीवघेणा स्टंट; तरुणाचे दोन्ही पाय…

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version