NSP Vs Shivsena : मोठी बातमी! नंदनवन निवासस्थानी मोठी खलबतं, जयंत पाटलांसह आव्हाड शिंदेंच्या भेटीला; पाऊण तासांपासून चर्चा सुरु

वर्षा बंगल्यानंतर आता नंदनवन निवासस्थानी मोठी खलबत सुरु असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेल्याचे सूत्रांची माहिती आहे.
NSP Vs Shivsena : मोठी बातमी! नंदनवन निवासस्थानी मोठी खलबतं, जयंत पाटलांसह आव्हाड शिंदेंच्या भेटीला; पाऊण तासांपासून चर्चा सुरु

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील महत्त्वाचे नेते एकाच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत निवासस्थानी ‘वर्षा’वर पोहोचल्याने विविध राजकीय तर्कांना उधाण आले होते. वर्षा बंगल्यानंतर आता नंदनवन निवासस्थानी मोठी खलबत सुरु असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेल्याचे सूत्रांची माहिती आहे.

हेही वाचा- Maharashtra Politcs : 'आगामी काळात ठाकरे-शिंदे एकत्र येतील, तर 15 दिवसांत राष्ट्रवादी…' बड्या नेत्याच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ

यावेळी जयंत पाटील यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड देखील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तावली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा बद्दलच्या अनेक चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान नंदनवन या ठिकाणी बैठक सुरू असून मागील पाऊण तासांपासून ही बैठक सुरू आहे. 

या बैठकीचा अधिकृत अजेंडा किंवा चर्चेचा तपशील अद्याप समोर आलेला नसला, तरी या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गट भविष्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)सोबत जाणार का, याबाबत विविध पातळ्यांवर चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण आकार घेते का, याकडे राजकीय निरीक्षक आणि जनतेचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version