एकीकडे मुंबईत अनेक मंडळांकडून गणरायाच्या जोरदार आगमनाची तयारी सुरु झालेली असताना शनिवारी मुंबईतील भुलेश्वरचा राजा आपल्या मंडपात विराजमान होण्यापूर्वीच मोठं विघ्न कोसळलं आहे. बाप्पाच्या आगमनादरम्यान भुलेश्वरच्या गणपतीची 22 फूट उंच मूर्तीचा तोल जाऊन मूर्ती कोसळली. यात पाच जण जखमी झाले असून दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यादरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात शोक व्यक्त केला जात आहे. यावर आता राजकीय वर्तूळातून सत्ताधारी नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त करत मोठी घोषणा केली आहे. भुलेश्वर गणपती दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबियांना पाच-पाच लाख रुपये मदत तर जखमींना एक-एक लाख रुपयाची मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आशिष शेलार काय म्हणाले?
यावेळी आशिष शेलार म्हणाले की, "ही दुर्दैवी घटना आहे त्यात आमचे दोन गणेश सेवक आपल्यातना निघून गेले त्यांना मी आदरांजली देतो. जे जखमी आहेत ते लवकर बरे व्हावेत. त्यांच्या परिवाराना मी भेटलो पोलिसांची मी बोलो आहे या मागच कारण काय आणि कशी घटना घडली याची चौकशी पोलीस करत आहेत. आपण उत्साहात सण साजरा करतो पण ही घटना दुःख देणारी आहे. सरकार कडून काही मदत केली जाईल ते आम्ही बघू. महापालिका पोलीस अन्य व्यवस्था याचा रोष कोणाचा दुर्घटना मागच कारण हा चौकशीचा मुद्दा आहे."
"काल मी आयुक्त यांच्याशी बोलो आज सकाळी देखील बोलो. पाटा खालचं व्हिल याचा दणका याची चिंता केली पाहिजे. सगळ्यांना विनंती आहे कि सूचनांच पालन केलं गेलं पाहिजे. आगनामनाचाच्या रस्त्यांवर तातडीने काम केलं पाहिजे. गणेश भक्त सगळे शोककळा करत आहेत. आज मी गणेश मूर्तिच्या उंचीवर भाष्य करणार नाही. सगळ्यांसोबत चर्चा करुन आम्ही या बाबत भाष्य करू. मृतांना व्यक्तिगत पाच-पाच लाख रुपये मदत तर जखमींना एक-एक लाख रुपयाची मदत…"
नेमकी घटना काय?
शनिवारी मुंबईतील भुलेश्वरचा राजा आपल्या मंडपात विराजमान होण्यापूर्वीच गणपतीची 22 फूट उंच मूर्तीचा तोल जाऊन मूर्ती कोसळली. यात पाच जण जखमी झाले असून दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यंदा भुलेश्वर राजा सार्वजनिक गणेश मंडळाचे हे 63 वे वर्ष आहे. भुलेश्वरच्या गणपतीची 22 फूट उंच मूर्ती भायखळ्यातील अनिकेत देसाई यांच्या कार्यशाळेतून भुलेश्वरला नेण्यात येत होती. यादरम्यान मंडपापासून 50-60 मीटर अंतरावर अचानक मूर्ती कोसळल्याची घटना घडली आहे.
या ठिकाणी रस्त्यावर कोणतेही खड्डे दिसत नसून प्राथमिक तपासानुसार, तोल गेल्यामुळे ही घटना घडली असावी असे म्हटले जात आहे. या दुर्घटनेत मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे आणि पदाधिकारी बृजेश जोशी हे दोघे ठार झाले असून, अन्य पाच जण जखमी आहेत. मंडपापासून काही अंतरावर असतानच ज्या क्रेनवर या 22 फूट उंच मूर्तीचा भार तोलून धरला होता ती क्रेन कमजोर निघाली आणि क्रेनमधून निसटलेली राजाची मूर्ती सरळ खाली कोसळली. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुलेश्वरमधील समुद्रीमाता मंदिराजवळ हा प्रकार घडला. आता भुलेश्वर राजाची भंगलेली मूर्ती विसर्जित केली जाईल आणि मग प्राथमिक तपास करून गुन्हे दाखल कले जातील, अशी माहिती पोलिसांनी दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.