Bhaskar Jadhav On Devendra Fadnavis : "फडणवीस हे मराठा आणि मराठीद्वेष्टे" जरांगेंचं उपोषण ते मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून भास्कर जाधवांनी सरकारला सुनावलं 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधवांनी जरांगे यांच्या उपोषणापासून रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीपर्यंत विविध मुद्द्यांवरून फडणवीस सरकारला सुनावलं आहे.
Bhaskar Jadhav On Devendra Fadnavis : "फडणवीस हे मराठा आणि मराठीद्वेष्टे" जरांगेंचं उपोषण ते मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून भास्कर जाधवांनी सरकारला सुनावलं 

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणापासून रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीपर्यंत विविध मुद्द्यांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे मराठा आणि मराठीद्वेष्टे असल्याचा गंभीर आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे.  

यावेळी भास्कर जाधव म्हणाले की, “हैदराबाद गॅझेटच्या तरतुदीनुसार प्रमाणपत्र मिळावे, अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे. सरकार प्रत्येक वेळी नवा जीआर काढते आणि उपोषण सोडवून मनोज जरांगे यांचा विश्वासघात करते, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला. मनोज जरांगे यांना भेटण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. सन 2013-14 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. त्याचा काही लोकांना लाभही झाला होता. आता कितीही प्रयत्न झाले तरी फडणवीस मराठा समाजाला आरक्षण देणार नाहीत, असा आरोप त्यांनी केला. माझा डीएनए काय आहे, हे बघा, असे त्यांचे आधीचे वक्तव्य एकदा तपासून पाहावे, असेही भास्कर जाधव म्हणाले. फडणवीस हे मराठाद्वेष्टे आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.”

हेही वाचा- Pune Amit Thackeray : शिवाजी महाराजांच्या शेजारील मोदींचा फोटो हटवण्यावरून वाद; पुण्यात अमित ठाकरेंसह कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल

रिक्षाचालकांसाठी मराठी सक्ती 
“मुख्यमंत्र्यांची सर्व क्षेत्रांत दादागिरी सुरू आहे. हम करे सो कायदा, अशा पद्धतीने फडणवीस वागत आहेत. प्रताप सरनाईक यांनी योग्य निर्णय आणि योग्य भूमिका घेतली होती. त्यांनी दांडगाई केली नाही, तर रिक्षाचालकांना मराठी शिकता यावी, यासाठी वेगवेगळी व्यवस्था केली होती. मी विरोधी पक्षाचा नेता असलो तरी प्रताप सरनाईक यांना यासाठी धन्यवाद देतो. 19 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी काहीच बोलले नाही. मात्र, अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर भाजपच्या संघटनेतील कुणीतरी मुस्लिम कार्यकर्त्याला पुढे करण्यात आले.”

“भाजपला मुस्लिमांचा तिरस्कार आहे, मात्र यावेळी त्यांना मुस्लिम चालला. फडणवीस यांनी रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. मुख्यमंत्र्यांना निर्णय बदलण्याचा अधिकार आहे, मात्र त्याची कार्यपद्धती वेगळी असते. मित्रपक्षांचे सरकार असताना सर्व नेत्यांना विश्वासात घेणे आवश्यक होते. मात्र, भाजपच्या मनात मराठी भाषा आणि मराठी माणसाबद्दल द्वेष आहे. मुख्यमंत्री हे मराठा आणि मराठीद्वेष्टे आहेत. शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठी भाषेबाबतचा निर्णय बदलतो, हे अनाकलनीय आहे. रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ देण्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय अत्यंत संतापजनक असून, त्याचा निषेध असल्याचे भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version