Bhaskar Jadhav on Ajit Pawar Plane Crash : ‘बारामतीत एक ठिणगी अन् महाराष्ट्र होरपळला असता’, विधानभवनात शोक प्रस्तावादरम्याने भास्कर जाधवांचा मोठा खुलासा

भास्कर जाधवांनीदेखील सभागृहात अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्राचा आधारवड उन्मळून पडला.
Bhaskar Jadhav on Ajit Pawar Plane Crash : ‘बारामतीत एक ठिणगी अन् महाराष्ट्र होरपळला असता’, विधानभवनात शोक प्रस्तावादरम्याने भास्कर जाधवांचा मोठा खुलासा

सध्या महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या सुरूवातीला राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी नेत्यांनी शोकप्रस्ताव सादर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

भास्कर जाधवांनीदेखील सभागृहात अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्राचा आधारवड उन्मळून पडला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. त्याचप्रमाणे अजित दादांच्या अपघाताबद्दल बोलत असताना ते म्हणाले की,  रोहित पवार घातपाताचा संशय व्यक्त करत असताना शरद पवार मात्र त्याला अपघात म्हणत होते. पवारांचे हे विधान विसंगत नव्हते. उलट, त्यावेळची स्फोटक परिस्थिती शांत करण्यासाठी आणि राज्याला मोठ्या संकटापासून वाचवण्यासाठी शरद पवारांनी केलेले ते अत्यंत योग्य विधान होते.

हेही वाचा – Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash : ‘ब्लॅक बॉक्स जळाला पण आमच्याकडे फोटो…’, अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट 

त्यावेळी बारामतीत एक ठिणगी पडली असती तर अख्खा महाराष्ट्र होरपळून निघाला असता. त्यामुळे आता काय चौकशी करायची आहे ती करा. सगळ्या महाराष्ट्राच्या मनात शंका आहे, असंही भास्कर जाधव म्हणाले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version