Bharat Gogawale : ‘आमच्या नेत्यांबद्दल बोलणार असेल तर आम्हीही रस्त्यावर उतरू…, हा रायगडच्या मावळ्याचा इशारा; गोगावले जरांगेंवर बरसले

Bharat Gogawale : ‘आमच्या नेत्यांबद्दल बोलणार असेल तर आम्हीही रस्त्यावर उतरू…, हा रायगडच्या मावळ्याचा इशारा; गोगावले जरांगेंवर बरसले

रायगड : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील आणि सरकारमधील नेतेमंडळी यांच्यात सध्या शाब्दिक चमचम पाहायला मिळत आहे. जरांगे पाटील यांची शिष्टमंडळातील मंत्र्यांवर आगपाखड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही त्यांनी धारेवर धरले. दरम्यान, यावरून सत्ताधाऱ्यांकडून त्यांवर जोरदार टीका होत आहे. त्यातच आता शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनीदेखील मनोज जरांगेंना खडेबोल सुनावले आहेत. 

मनोज जरांगे पाटील सातत्याने महायुतीतील नेत्यांना एकेरी शब्दात लक्ष्य करत आहेत. त्यामुळे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत यांच्यानंतर आता मंत्री भरत गोगावले यांनी मनोज जरांगे पाटील यांना जपून बोलण्याचा सल्ला देतानाच आमच्या नेत्यांबद्दल एकही अपशब्द घपवून घेणार नाही, आम्हीही मराठा आहोत…, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. 

हेही वाचा : Cabinet Meeting Decision : नोकरीसाठी सुधारित आरक्षण धोरण ते भांडवली अनुदानास मंजुरी; राज्य मंत्रिमंडळाचे 7 महत्त्वाचे निर्णय

मनोज जरांगे पाटील समाजासाठी लढतायेत, आरक्षण प्रश्नी भूमिका मांडतायेत. शासन म्हणून आम्हीही त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत आहोत. मात्र आमच्या नेत्यांवर ते एकेरी शब्दात बोलतील तर आम्ही सहन करणार नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी गेल्या काही वर्षांत प्रचंड मोठे काम केले आहे. सारथीला निधी दिला आहे. समाजातील मुलांसाठी साडे पाच हजार अधिकसंख्य पदे भरली आहेत. असे असतानाही जरांगे पाटील वैयक्तिक हल्ले करतील असतील तर त्यांनाही जशास तसे उत्तर देऊ. आम्हीही मराठा आहोत, जाऊन सांगा त्याला.., असे प्रत्युत्तर मंत्री गोगावले यांनी दिले. आरक्षणप्रश्नी त्यांनी त्यांची भूमिका मांडावी. पण राजकारणावर जरांगे बोलले तर आम्हीही आमच्या स्टाईलने उत्तर देऊ, आम्ही पण मराठे आहोत, आमच्यावर पण केसेस आहेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर एकेरी बोलत असेल तर जशास तसे उत्तर देऊ. हा रायगडच्या मावळ्याचा इशारा आहे, असे गोगावले म्हणाले.

पुढे मंत्री गोगावले म्हणाले की, लोकशाहीत सर्वांना मोर्चा आंदोलनाचा अधिकार आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून मराठा समाजाला जेवढे दिले तेवढे कोणत्याही नेत्याने दिले नव्हते. परंतु कोणाच्या तोंडातले काढून द्या, असे जर कुणी म्हणत असेल तर ते कसे मान्य होईल…? आम्ही तुम्हाला साहेब म्हणून बोलतो, पण तुम्ही थेट एकेरीवरच येताय…. आम्ही पण कार्यकर्ते आहोत, आमच्या नेत्यांबद्दल बोलणार असेल तर आम्हीही रस्त्यावर उतरू शकतो, असे गोगावले म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version