Ashwini Bhide : मुंबई महापालिकेची धुरा महिलांच्या हाती! महापौरनंतर आता आयुक्त पदावरही महिला?

मुंबई महानगरपालिका संबंधित एक मोठी माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
Ashwini Bhide : मुंबई महापालिकेची धुरा महिलांच्या हाती! महापौरनंतर आता आयुक्त पदावरही महिला?

मुंबई महानगरपालिका संबंधित एक मोठी माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात महापालिका आयुक्त पदाबाबत काल बैठक झाली. त्यानंतर आयुक्त पदासाठी चर्चेत असणाऱ्या अश्विनी भिडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी अश्विनी भिडे आणि एकनाथ शिंदे यांच्यात 1 तास चर्चा झाली असून अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती. मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे 31 मार्च रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या ठिकाणी आता अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती आहे. अश्विनी भिडे या 1995 बॅचच्या आयएएस अधिकारी असून त्यांनी मुंबई मेट्रो आणि कोस्टल रोड प्रोजेक्टच्या उभारणीत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्यानंतर आता त्या मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी निवड होणाऱ्या अश्विनी भिडे या पहिल्या महिला अधिकारी ठरणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version