महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा गढूळ झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी पक्षातील सर्व पदांचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पाठवला असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
आनंद परांजपे यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. 12 वर्षानंतर आनंद परांजपे यांची शिवसेनेत घरवापसी झाली आहे. यावेळी मंत्री दादा भुसे देखील उपस्थित होते.
यावेळी आनंद परांजपे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “मी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करत आहे. शिवसेनेतून सुरू झालेला प्रवास मी पुन्हा एकदा शिवसेनेतूनच सुरू करत आहे. कोणत्याही पदाच्या लालसेने मी शिवसेनेत प्रवेश केला नाही”, असं ते म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.