मविआ सरकारमध्ये गोंधळाचे वातावरण – चंद्रकांत पाटील

मविआ सरकारमध्ये गोंधळाचे वातावरण – चंद्रकांत पाटील

आज हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. आजही विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. निवडणुकीचा खेळखंडोबा झाला असून महाविकास आघाडी सरकारमध्ये गोंधळाचे वातावरण असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच अनेक प्रश्नांबाबत मविआमध्ये गोंधळ असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

तसेच चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर भाष्य केले. छत्रपती शिवाजी महाराज आपली प्रेरणा असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालताना वडेट्टीवार यांनी काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक प्रश्नांबाबत गोंधळ आहे. राज्यपालांनी दिलेल्या तारखेला विधानसभा अध्यक्षांची निवडणूक न घेणे हा राज्यपाल आणि घटनेचा अवमान आहे. घटनेचा अवमान केल्याप्रकरणी राष्ट्रपती राजवट लागू शकते, असे विधानही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version