NCP Vidhan Parishad : "माझ्या संघर्षाचं हेच फळ" राष्ट्रवादीकडून झिशान सिद्धीकींना उमेदवारी जाहीर, अमोल मिटकरी यांचा नाराजीचा सूर?

राष्ट्रवादीकडून झिशान सिद्धीकींना उमेदवारी जाहीर होताच अमोल मिटकरी यांच्याकडून नाराजीचा सूर उमटला आहे. अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. 
NCP Vidhan Parishad : "माझ्या संघर्षाचं हेच फळ" राष्ट्रवादीकडून झिशान सिद्धीकींना उमेदवारी जाहीर, अमोल मिटकरी यांचा नाराजीचा सूर?

सर्वत्र विधानपरिषद निवडणुकांचे बिगुल वाजत आहे. आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. याचपार्श्वभूमिवर  भाजप, उबाठाकडून विधान परिषदेसाठी उमेदवार जाहीर केला आहे. तसेच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील उमेदवार जाहीर केला आहे. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून झिशान सिद्धीकी यांना विधानपरिषद उमेदवारी जाहीर झाली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून झिशान सिद्धीकी यांना उमेदवारी जाहीर होताच राष्ट्रवादीत वेगवान घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीकडून झिशान सिद्धीकींना उमेदवारी जाहीर होताच अमोल मिटकरी यांच्याकडून नाराजीचा सूर उमटला आहे. अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. 

हेही वाचा- Zeeshan Siddique : “अजित पवार शब्द सुनेत्रा पवारांनी पाळला” विधान परिषदेसाठी नाव निश्चित होताच झिशान सिद्दीकी यांची पहिली प्रतिक्रिया
अमोल मिटकरी नाराज 
अमोल मिटकरी ट्वीट करत म्हणाले की, “मी २९ जानेवारीलाच मानसिक तयारी केली होती की माझ्या संघर्षाचं हेच फळ असेल, दादा… काळजी करू नका. …दादा, तुमच्यासाठी ‘एक संधी’ काय आहे—अमोल मिटकारी तुमच्यावर ‘हजार संधींचा’ वर्षाव करतील. तुमचा लढा कालही लढला गेला, आजही लढला जात आहे आणि उद्याही लढला जाईल, या लढाईत तुमच्यासोबत कोणी उभं राहो वा न राहो—जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही; तीच तुमची खरी श्रद्धांजली असेल! जोपर्यंत अपघाताचं सत्य समोर येत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही; गरज पडल्यास, मी त्याहूनही मोठी किंमत मोजेन #आम्हीआमचेजीवदेऊ”

झिशान सिद्धीकी यांचा उमेदवारी अर्ज दाखल 
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवान घडामोडी घडत आहेत. याचपार्श्वभूमिवर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून झिशान सिद्धीकी यांना विधानपरिषद उमेदवारी जाहीर झाली आहे. झिशान सिद्धीकी यांच्या नावावर पक्षातील जवळपास सर्वच नेत्यांकडून सकारात्मक पाठिंबा देण्यात आला होता. राष्ट्रवादी कांग्रेसचे उमेदवार झिशान सिद्धीकी निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष  सुनील तटकरे, छगन भुजबळ, इंद्रनील नाईक या प्रमुख नेत्यांची उपस्थिती देखील पाहायला मिळाली आहे.

हेही वाचा- Bacchu Kadu Vidhan Parishad : बच्चू कडूंना विधानपरिषदेची उमेदवारी, ‘प्रहार’ पक्ष शिवसेनेत विलीन होणार?

विधान परिषदेच्या जागा साठी 12 मे रोजी मतदान होणार असून ही लढत विधान परिषदेच्या 9 जागांवर होणार आहे. याचपार्श्वभूमिवर आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. महायुतीकडून 8 तर महाविकास आघाडीकडून 1 उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. भाजप, उबाठाकडून विधान परिषदेसाठी उमेदवार जाहीर केला आहे. उबाठा गटाने काँग्रेसला विचारात न घेता उमेदवार जाहीर त्यामुळे काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार का पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे महायुती निवडणूक बिनविरोध करणार की 9 वा उमेदवार देऊन लढत करणार याकडे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version