Maharashtra Invesment : आता महाराष्ट्रात नोकरीची मोठी संधी! एकीकडे AI मुळे नोकऱ्यांवर संकट असताना खासदार श्रीकांत शिंदेंनी उचललं मोठ पाऊल

महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी चांगली बातमी आहे. शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ‘एएम इंटेलिजन्स लॅब्स’ कंपनीसोबत मुंबई आणि दिल्लीत घेतलेल्या बैठकांना व पाठपुराव्याला मोठं यश मिळालं आहे.
Maharashtra Invesment : आता महाराष्ट्रात नोकरीची मोठी संधी! एकीकडे AI मुळे नोकऱ्यांवर संकट असताना खासदार श्रीकांत शिंदेंनी उचललं मोठ पाऊल

अमेरिका-इराण युद्धामुळे देशातील आर्थिक स्थिती बिघडली आहे. एकीकडे आखाती देशातील तणावामुळे राज्यात आणि देशात महागाईचा फटका बसत आहे, तर दुसरीकडे आयटी क्षेत्राला AI चा फटका बसताना दिसतो आहे. AI मुळे कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करण्यात आल्याच्या बातम्यात समोर येत आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय तणावामुळे डॉलर समोर रोज रुपया घसरतानाचे दृष्य पाहायला मिळत आहे. परिणामी अर्थव्यवस्थेवर दबाव वाढत चालला असून एक मंदी सदृश्य स्थिती तयार होत चालली आहे.

हेही वाचा- CM Devendra Fadanvis On Onion Price: कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा; नवे दर जाहीर

अशातच महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे. शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ‘एएम इंटेलिजन्स लॅब्स’ कंपनीसोबत मुंबई आणि दिल्लीत घेतलेल्या बैठकांना व पाठपुराव्याला मोठं यश मिळालं आहे. शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने ‘एएम इंटेलिजन्स लॅब्स’ची महाराष्ट्रात 1 लाख 14 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत नुकताच हा सामंजस्य करार झाला आहे. या करारानुसार एमएमआर क्षेत्रात 500 MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब' व डेटा सेंटर पार्क उभारणार आहे. तसेच या गुंतवणुकीमुळे मुंबई महानगर क्षेत्रात आयटी सेवेतील 3000 हायटेक नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version