Ajit Pawar Funeral : अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी पोलीस मानवंदना देताना Gun Firing चा आवाज, नेमकं काय घडलं?

अजित पवार यांच्या अंत्यासाकराच्या वेळेस अखेरची सलामी देताना एका पोलीस कर्मचाऱ्याकडून चुकून फायरिंग झाल्याचा प्रकार घडला आहे. यावर पोलिसांनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे.
Ajit Pawar Funeral : अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी पोलीस मानवंदना देताना Gun Firing चा आवाज, नेमकं काय घडलं?

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीकडे येत असताना पुणे–बारामती परिसरात अजित पवार यांच्या विमानाचा लॅंडिंगदरम्यान अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, या विमानात उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबतचं इतर पाच जणांचा देखील मृत्यू झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोककळा पसरली. 

हेही वाचा- Pune News: पवारांच्या राष्ट्रवादीवर एकाच आठवड्यात दोन मोठे आघात; अजितदादांनंतर आता पुण्यातील ‘हा’ मोहरा हरपला
त्यानंतर अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी 11 वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शासकिय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले. त्यांची दोन मुलं जय पवार आणि पार्थ पवार यांच्याकडून अजित पवार यांना मुखाग्नी देण्यात येत होता. यादरम्यान अजित पवार यांच्या अंत्यासाकराच्या वेळेस अखेरची सलामी देताना एका पोलीस कर्मचाऱ्याकडून चुकून फायरिंग झाल्याचा प्रकार घडला आहे. शोक सलामी देण्यासाठी बंदूक लोड करतानाच चुकून गोळी झाडली गेल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. अजित दादांना मुखाग्नी देताना शासकीय सलामी देण्यात आली होती. 

हेही वाचा- Maharashtra Political Update : दादांच्या अकाली एक्झिटनंतर ‘वर्षा’ बंगल्यावर मोठ्या हालचाली, राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांच्या भेटीला; उपमुख्यमंत्रीपदावर दावा?
अजित पवार यांच्या अंत्यविधीदरम्यान विशाल जनसमुदायाने साश्रू नयनाने आपल्या लाडक्या नेत्याला शासकीय मानवंदना देत निरोप दिला. अजित पवार यांना सलामी म्हणून पोलिसांकडून तीन राऊंड हवेत फायर करण्यात आले. यावेळी समोरच्या रांगेतील पोलिसाकडून पहिला राऊंड फायर केल्यानंतर दुसरा राऊंड फायर करताना बंदुकीतून चुकून फायरिंग झालं. सुदैवाने बंदुकीतून सुटलेली ही गोळी कोणाला लागली नाही. त्यावेळी समोर अनेक मोठे नेते असताना मोठी दुर्घटना टळली असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पोलिसांकडून स्पष्टीकरण काय?
अजित पवार यांना अखेरची शोक सलामी देताना राउंड फायर करताना चुकून एक राउंड फायर झाला होता असे समोर आलं होतं. यावर आता पोलिसांची प्रतिक्रिया आली आहे. शासकीय इतमामात अजित पवारांवर अंत्यसंस्कार करताना शोक सलामीसाठी वापरण्यात येणारे राऊंड डमी असल्याचे स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आलं आहे. तसेच बंदुकीच्या गोळीप्रमाणे या बुलेट्समध्ये इजा होण्याची क्षमता नसते. सलामीसाठी तीन राउंड फायर केले जातात तेव्हा या गोळ्या वापरल्या जातात असे पोलिसांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version