आज दुपारी 2 वाजता पुन्हा शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. दरम्यान, काल सुनावणी झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाबाहेर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात जोरदार ड्रामा पाहायला मिळाला.
हेही वाचा- सर्वात मोठी बातमी! राज ठाकरे अचानक ‘वर्षा’वर दाखल, फडणवीसांसोबतच्या भेटीने चर्चांना उधाण
शिवसेना शिंदे गटाकडून नरेश म्हस्के आणि शिवसेना ठाकरे गटाकडून संजय राऊत, अनिल देसाई माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर न्यायालयाबाहेर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, अनिल देसाई आणि शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के समोरासमोर आले.
नरेश म्हस्के आणि संजय राऊत एकमेकांना काहीतरी बोलत होते. यानंतर ठाकरे गटाचे अनिल देसाई नरेश म्हस्के यांच्या दिशेने धावत गेल्याने जोरदार ड्रामा झाला. कोर्टाच्या बाहेर दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये शाब्दिक व लक्षवेधक प्रसंग पाहायला मिळाला.अनिल देसाई अचानक नरेश म्हस्केंच्या दिशेने गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. कोर्टाच्या बाहेर दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये शाब्दिक व लक्षवेधक प्रसंग पाहायला मिळाला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.