Prakash Mahajan On Raj Thackeray : “मी पुंडलिक झालो, पण विठ्ठलानेच वीट फेकून मारली”, नाराज प्रकाश महाजनांनी व्यक्त केली राज ठाकरेंबाबतची भावना

मनसे नेते प्रकाश महाजन यांनी ऐन मुंबई महानगपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर मनसेची साथ सोडली. तसेच त्यांनी धनुष्यबाण हाती घेत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
Prakash Mahajan On Raj Thackeray : “मी पुंडलिक झालो, पण विठ्ठलानेच वीट फेकून मारली”, नाराज प्रकाश महाजनांनी व्यक्त केली राज ठाकरेंबाबतची भावना

मनसे नेते प्रकाश महाजन यांनी ऐन मुंबई महानगपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर मनसेची साथ सोडली. तसेच त्यांनी धनुष्यबाण हाती घेत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. प्रकाश महाजन यांनी 13 सप्टेंबर रोजी मनसे पक्षाला राजीनामा दिला होता. या घडामोडींमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला धक्का बसल्याचे मानले जात होता. अशातच त्यांनी आता प्रकाश महाजन यांनी स्वत:ला पुंडलिक म्हणत राज ठाकरेंना विठ्ठल म्हटलं, एवढचं नव्हे तर माझ्याच विठ्ठलाने मला वीट फेकून मारली असं देखील वक्तव्य त्यांनी केलं.

हेही वाचा- PMC Election : पुण्यात महायुतीत बिनसलं? भाजपसोबत गणित जुळेना.. धंगेकरांनी घेतली अजित पवारांची भेट

यावेळी प्रकाश महाजन म्हणाले की, " मी हिंदुत्वासाठी काम करत होतो. मी पुंडलिक झालो होतो. पण विठ्ठलाने मला वीट फेकून मारली तर मी काय करणार? पुंडलिकाला कुणीतरी विठ्ठल पाहिजे असतो. आपला भक्त पुंडलिक असावा याची विठ्ठलाने काळजी घेतली पाहिजे आणि विठ्ठलाने तसं वागलंही पाहिजे ती पुंडलिकांची एकट्याची जबाबदारी नाही. विठ्ठलासाठी आम्ही काय केलं नाही? मग निष्ठा आम्हीच पाळायची का? मी निष्ठा बदलणार नाही म्हटलं होतं. पण विठ्ठलाने आम्हाला हमी दिली का? भक्ताला रुसायचं रागवायचा हक्क आहे की नाही? की विठ्ठलानेच मारक्या म्हशीसारखं बघत बसायचं भक्ताकडे? विठ्ठलाने भक्त बदलले, तर मग आम्ही आमचा विठ्ठल का बदलू नये? लहान कार्यकर्त्याने पक्ष बदलला की तो निष्ठावान नाही, तो गद्दार, मोठ्यांनी केलं तर काय?" असा प्रश्न उपस्थित करत प्रकाश महाजन यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंवर रोख धरला होता. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version