अभिनेता, मॉडेल व कास्टिंग दिग्दर्शक आदित्य सिंह राजपूतचं निधन झालं आहे. सोमवारी(२२ मे) दुपारी मुंबईतील अंधेरी येथील राहत्या घरात त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. परंतु, अंमली पदार्थाच अतिसेवन केल्यामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आदित्यच्या मृत्यूने मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे.
आदित्यच्या काही मित्रांना घरातील बाथरुममध्ये त्याचा मृतदेह आढळला. आदित्यच्या मित्रांनी सुरक्षा रक्षकाच्या मदतीने त्याला लगेचच रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.