Chhatrapati Sambhajinagar : तब्बल 14 लाख रुपयांची लाच, पैशानं भरलेली बॅग; पोलीस अधिकाऱ्याचा बॅगेसोबतचा व्हिडीओ व्हायरल

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने 14 लाखांची लाच घेतल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Chhatrapati Sambhajinagar : तब्बल 14 लाख रुपयांची लाच, पैशानं भरलेली बॅग; पोलीस अधिकाऱ्याचा बॅगेसोबतचा व्हिडीओ व्हायरल

विजय चिडे, प्रतिनिधी 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने 14 लाखांची लाच घेतल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एक पोलीस कर्मचारी 14 लाखांची लाच घेतानाचा हा व्हिडीओ असल्याचा दावा केला जात आहे. संभाजीनगरच्या लेणी परिसरात सुरू असलेल्या अवैध उत्खननावर कारवाई करू नयेत यासाठी एका पोलीस निरीक्षकाने आपल्या रायटरच्या माध्यमातून लाच घेतल्याचादेखील दावा केला जात आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती 14 लाख रुपये मोजून घेताना दिसत आहे. ही व्यक्ती पोलीस कर्मचारी असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात लाचेची रक्कम घेतली जात असल्याच्या दाव्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तर या सर्व घटनेवर पोलिसांची देखील प्रतिक्रिया आली आहे. व्हिडीओत दिसणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्या निलंबित करण्यात आले आहे. तसेच ज्या पोलीस निरीक्षकावर आरोप करण्यात आले त्यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली असल्याची माहिती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी दिली आहे

हेही वाचा : Dhananjay Munde: ‘मुख्यमंत्री आमच्यासाठी कामधेनू…’; धनंजय मुंडेंनी परळीतून मांडली ‘मनातील इच्छा’, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version