Mumbai Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! तब्बल 120 लोकल फेऱ्या रद्द… घराबाहेर पडण्याआधी तिन्ही रेल्वेमार्गांवरील वेळापत्रक पाहा

मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी या आठवड्याचा शेवट प्रवासाच्या दृष्टीने कसरतीचा ठरणार आहे. मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि पनवेल ते वाशीदरम्यान मोठे ब्लॉक घेण्यात आले आहेत
Mumbai Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! तब्बल 120 लोकल फेऱ्या रद्द… घराबाहेर पडण्याआधी तिन्ही रेल्वेमार्गांवरील वेळापत्रक पाहा

मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी या आठवड्याचा शेवट प्रवासाच्या दृष्टीने कसरतीचा ठरणार आहे. मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि पनवेल ते वाशीदरम्यान मोठे ब्लॉक घेण्यात आले आहेत. पश्चिम रेल्वेवर आणि सीएसएमटी ते पनवेल, ठाणे ते पनवेलदरम्यान शेकडो लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून प्रवाशांनी वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे

पश्चिम रेल्वे मार्गावर गेल्या काही दिवसांपासून कांदिवली ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामाला वेग आला आहे. यानिमित्त मागिल काही दिवस पश्चिम रेल्वे मार्गावरील अनेक लोकलसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. यानिमित्त आज, रविवारी देखील 120 लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत, तर काही लोकल फेऱ्या उशिराने धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा- A R Rahman : 'विकी कौशलचा 'छावा' समाजात फूट पाडणारा चित्रपट; ए. आर. रहमान यांचं वादग्रस्त वक्तव्य

तसेच मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल उशिराने धावणार आहेत. तर घाटकोपर येथून सकाळी 10.19 ते दुपारी 3.52 या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येणार असून, त्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ व भायखळा स्थानकांवर थांबतील. ब्लॉकवेळेत अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे.

तर हार्बर रेल्वेवरील सीएसएमटी ते पनवेल, ठाणे ते पनवेलदरम्यान काही लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 या वेळेतील काही लोकल रद्द करण्यात आले असून काही लोकल उशिराने धावतील. दरम्यान तिन्ही रेल्वे मार्गावरील रेल्वेच्या पायाभूत सुविधांची सुरक्षितता आणि कार्यक्षमता राखण्यासाठी हा ब्लॉक आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version