Mumbai Sathye College : विलेपार्लेच्या साठ्ये कॉलेजबाहेर राडा! मनविसे आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ;Video Viral

विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयाबाहेर सायंकाळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये सदस्य नोंदणीवरून जोरदार वाद झाला
Mumbai Sathye College : विलेपार्लेच्या साठ्ये कॉलेजबाहेर राडा! मनविसे आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ;Video Viral

मुंबईतील साठ्ये कॉलेज बाहेर तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयाबाहेर सायंकाळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये सदस्य नोंदणीवरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. अखेर पोलिसांनी दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांची समजूत काढून प्रकरण शांत केले.

हेही वाचा- Gold Mine Collapse: अचानक हाहाकार माजला! सोन्याची खाण कोसळून 100 कामगारांचा जागीच मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली?

सध्या मुंबईत विविध विद्यार्थी संघटनांच्या सदस्य नोंदणीचा उपक्रम सुरू आहे. यासाठी संघटनांचे कार्यकर्ते विविध महाविद्यालयांबाहेर आपला नोंदणी कक्ष उभारत आहेत. मनविसेच्या कार्यकर्त्यांनी साठ्ये महाविद्यालय प्राचार्यांची परवानगी घेऊन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून 200 मीटरच्या अंतरावर नोंदणी कक्ष उभारला. त्याचवेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनीही त्यासाठी परवानगी मिळवली.

मात्र त्यांना मिळालेल्या जागेच्या परिसरात एका इमारतीचे काम सुरू असल्याने त्यांनी मनविसेच्या बाजूलाच आपला नोंदणी कक्ष सुरू केला. त्यावरून दोन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. शाब्दिक स्वरूपात सुरू झालेल्या या वादाचे पर्यवसान अखेर हाणामारीत झाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version