Buldhana Sanjay Gaikwad: "पण बाई बापासारखं शरीर आणणार कुठून?" महालेंवर टीका करताना संजय गायकवडांची जीभ घसरली; थेट महिलेची तक्रार, गुन्हा दाखल..

बुलढाण्यात शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजप आमदार श्वेता महाले यांच्यातीस वाद कमी होत नसून पेटल्याचे बघायला मिळत आहे.
Buldhana Sanjay Gaikwad: "पण बाई बापासारखं शरीर आणणार कुठून?" महालेंवर टीका करताना संजय गायकवडांची जीभ घसरली; थेट महिलेची तक्रार, गुन्हा दाखल..

बुलढाण्यात शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजप आमदार श्वेता महाले यांच्यातीस वाद कमी होत नसून पेटल्याचे बघायला मिळत आहे. आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले हे सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव आहेत, त्यांचा वाढदिवस बुलढाण्यात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमीत्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये 'बाप तो बाप रहेगा….' अशा प्रकारे गाणेही वाजवण्यात आले होते.

बाप तो बाप रहेगा हे माणसाने बोललेले बरं. पण एखाद्या बाईने म्हटले की बाप आहे… तर बाई बापासारखे शरीर कुठून आणणार आहे. या विधानानंतर संजय गायकवाड यांच्या विरोधात एका महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. बुलढाणा पोलिसांत आमदार गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. 

त्यानंतर चिखली मतदार संघातील धाड येथे दहीहंडी कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या भाषणातून बोलतांना विद्याधर महाले यांच्यावर टीका केली. संजय गायकवाड म्हणाले की, "बाप तो बाप रहेगा हे माणसाने बोललेले बरं. पण एखाद्या बाईने म्हटले की बाप आहे… तर बाई बापासारखे शरीर कुठून आणणार आहे. मी केवळ केबिनमध्ये बसून फोनवर धमक्या देणारा आमदार नाही, मी पाचव्या मजल्यावरून कार्यक्रम करून टाकील!" असा इशारा दिला होता.

हेही वाचा- BJP MP Resign : भाजपच्या 'या' ज्येष्ठ नेत्याने दिला राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा; मोदी सरकारने सोपवली 'ही' मोठी जबाबदार

या विधानावर महिलांच्या लज्जेस धक्का पोहोचला असून महिलांच्या शरीर ठेवणीवर प्रहार करण्यात आला, असा आरोप करत संजय गायकवाड यांनी हे विधान हेतू पुरस्कर केल्याची तक्रार करत एका 42 वर्षीय महिलेने आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून मध्यरात्री आ. संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तर संजय गायकवाड यांच्या विधानावर आमदार श्वेता महाले यांनी पलटवार केला असून त्या म्हणाल्या की, "कार्यक्रम कोणाचा करायचा हे जनता ठरवते. तुम्ही 80 हजार मतांनी निवडून येणार असे सांगत होतात. मात्र तुम्ही आठशे मतांनी निवडून आलात त्यामुळे कोणाचा कार्यक्रम कोण करत हे बोलण्याची गरज नाही. असा चिमटा श्वेता महाले यांनी आमदार गायकवाड यांना काढला आहे. बूम समोर आले की काही बोलायचं, उचलली जीभ की लावली टाळूला. असे संस्कार आमचे नाहीत." असा टोमनाही श्वेता महाले यांनी लगावला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version