Ajit Pawar Statue : अजित पवार यांना आदरांजली, बारामतीत उभारणार 10 फुट उंचीचा पुतळा; व्हिडीओ समोर

बारामतीतील तिरंगा चौकात अजित पवार यांचा पुतळा बसवला जाणार आहे.
Ajit Pawar Statue : अजित पवार यांना आदरांजली, बारामतीत उभारणार 10 फुट उंचीचा पुतळा; व्हिडीओ समोर

बारामती : बारामतीतील तिरंगा चौकात अजित पवार यांचा पुतळा बसवला जाणार आहे. या पुतळ्याची एकूण उंची 15 फूट इतकी असणार आहे. हा पुतळा कांस्य धातूचा असणार आहे. सध्या या पुतळ्याची निर्मिती सुरू असून याची पहिली झलक समोर आली आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी बारामतीत विमान अपघातात अकाली निधन झाले. ते मुंबईहून बारामतीच्या दिशेनं खासगी विमानाने येत होते. मात्र लँडिंग करत असताना त्यांच्या विमानाला अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हळहळलं. अजित पवारांचा हा पूर्णाकृती पुतळा असणार आहे. याची उंची 10 फूट असणार असून हा पुतळा उभारण्यासाठी पाच फुट उंचीचा चौथरा बांधला जाणार आहे. म्हणजेच या पुतळ्याची एकूण उंची 15 फूट इतकी असणार आहे. या पुतळ्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. ज्यात लाडकी बहीण योजनेदरम्यान अजित पवारांचं फेमस झालेलं जॅकेटही परिधान केल्याचं दिसत आहे.

हेही वाचा : Maharashtra Weather Update: फेब्रुवारीतच उन्हाळ्याची चाहूल! राज्यात तापमानात झपाट्याने वाढ, IMDचा अलर्ट जारी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version