‘भाजपा नेत्यावर ईडी कारवाई दाखवा’

‘भाजपा नेत्यावर ईडी कारवाई दाखवा’

जतमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसने उभारला अनोखा फलक

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस बजावली आहे. यानंतर सांगलीतील राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जतमध्ये उभारलेल्या फलकाची जोरदार चर्चा सुरू आहे. जयंत पाटील याना आलेल्या नोटिशीच्या निषेधार्थ जतच्या एसटी स्टँड समोर चक्क डिजिटल बोर्ड लावत ईडीच्या नोटिसीबाबत निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

यामध्ये भाजपच्या नेत्यावर ईडीची कारवाई दाखवा आणि १ लाख रुपये बक्षीस मिळवा, असा मजकूर असलेला फलक उभारत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याना ईडीने पाठवलेल्या नोटीसचा निषेध करण्यात आला आहे. जत तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली. राजकीय क्षेत्रात या डिजिटल बोर्डची चर्चा जोरात सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version