सईच्या अभिनयाची भूमीला पडली भुरळ !

सईच्या अभिनयाची भूमीला पडली भुरळ !

मुंबई , २६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : अभिनेत्री सई सई ताम्हणकरसाठी २०२४ हे वर्ष नक्कीच अभूतपूर्व ठरलं आहे. ” श्री देवी प्रसन्न ” पासून ” भक्षक ” पर्यंत तिच्या अनस्टोबेल कामाची जादू ती कायम दाखवत राहिली आहे. नुकत्याच रिलीज झालेला भक्षक नेटफ्लिक्स वर नंबर १ वर ट्रेंड झाला आणि आता तिच्या अभिनयाची भुरळ अभिनेत्री भूमी पेंडणेकरला पडली आहे. भूमीने तिच्या सोशल मीडिया स्टोरी मधून सई सोबतचा काम करण्याचा अनुभव शेयर करून तिच्या अभिनयाचं खास कौतुक केलं आहे.

नेटफ्लिक्सवर ” भक्षक ” च्या उत्तुंग यश कमवत असून सोबतीला समीक्षकांच्या प्रशंसा आणि सई ताम्हणकर च्या अभिनयाच्या चर्चा सर्वत्र होत आहे. २०२४ वर्षात दमदार कामाची सुरुवात तिने सुरू ठेवली आहे. बॉलीवूड मध्ये सई पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

सई चर्चेत आली ती म्हणजे भूमीच्या सोशल मीडिया स्टोरी मुळे भक्षक च अभूतपूर्व यश आणि सईच्या अभिनयाचं कौतुक अजूनही सुरू आहे. सोबतीला तिच्या अभिनयाचं कौतुक भूमीने देखील केलं भूमी ला एका फॅन ने सई सोबत काम करण्याचा अनुभव विचारला असताना ती या सगळ्या बद्दल म्हणते “
“मी सईच्या कामाची नेहमीच फॅन आहे. मी “हंटर” पाहिला आणि तेव्हा पासून आज पर्यंत तिच्या अभिनयाची चाहती आहे. तिच्या अभिनयाचा मी खूप इतका आनंद घेतला होता जेव्हा मला पुलकितने सांगितलं सई सुद्धा ” भक्षक ” चा एक भाग आहे तेव्हा मी सई सोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक होती. तिचा या चित्रपटातला एक भाग माझ्या खूप जवळचा आहे जेव्हा ती बालिका गृहात प्रवेश करते आणि ज्या पद्धतीने तिने तो सीन केला आहे तेव्हा तो मला आणि सगळ्यांना भावुक करून जातो. अभिनयातील लालित्य आणि तिचे बोलके डोळे सगळं काही सांगून जातात आणि म्हणून ती अद्भुत अभिनेत्री आहे “

मराठीच्या सोबतीने बॉलिवुड मध्ये उंच भरारी घेऊन सई भक्कम पणे पाय रोवून दोन्ही इंडस्ट्रीत काम करताना दिसतेय. विविध माध्यमातून अखंडपणे स्थित्यंतर काम करणारी अभिनेत्री म्हणून ती अष्टपैलुत्व अभिनयाने सगळ्यांची मन जिंकत आहे. एकीकडे कौतुकाचा वर्षाव होत असताना सई न थांबता सध्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट साठी शूट करण्यात बीजी असून येणाऱ्या काळात ती अजून उत्तम प्रोजेक्ट घेऊन येणार यात शंका नाही.

https://www.jaimaharashtranews.com/wp-content/uploads/2024/02/8B4B9DEF37ABBACC5AA27E2D86A14DA7_video_dashinit.mp4

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version