पहिल्या दिवशी जयस्वाल यशस्वी

पहिल्या दिवशी जयस्वाल यशस्वी

विशाखापट्टणम, २ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाचत कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली. दुसरी कसोटी विशाखापट्टणम येथे सुरू आहे. या कसोटीत पहिल्या दिवसअखेर भारताने ६ बाद ३३६ धावा केल्या. भारताकडून सलामीवीर यशस्वी जयस्वालने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २५७ चेंडूत नाबाद १७९ धावा केल्या. यशस्वी धावांचा डोंगर उभारताना पाच षटकार आणि सतरा चौकारांची आतषबाजी केली. रोहित शर्माने १४, शुभमन गिलने ३४, श्रेयस अय्यरने २७, रजत पाटीदारने ३२, अक्षर पटेलने २७, श्रीकर भारतने १७, आर. अश्विनने नाबाद ५ धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून शोएब बशीर आणि रेहान अहमद या दोघांनी प्रत्येक दोन बळी घेतले. तर जेम्स अँडरसन आणि टॉम हार्टली या दोघांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version