भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाचे स्वागत करताना आकाशात उंच भरारी घेतली आहे. पुनम यांनी दुबईत स्काय डायव्हिंगचा थरार अनुभवला. स्काय डायव्हिंग म्हणजे उडत्या विमानातून पॅराशूटसह जमिनीकडे झेपावणे. हा थरार अनुभवणे ही आपल्या आयुष्यातील एक राहून गेलेली गोष्ट होती असं नमूद करतानाच पूनम महाजन म्हणाल्या की येत्या वर्षातील अनेक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी काय डायव्हिंगचा थरार अनुभवणे गरजेचे होतं. पूनम यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या प्रेक्षकांसाठी हा खास व्हिडिओ पाठवला आहे. नववर्ष २०२४ हे लोकसभा निवडणुकांचे वर्ष असून त्या काळात पूनम यांना नव्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ लक्षवेधी ठरतो आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.