आंतरवालीतील घटनेच्या चौकशीला वेग येणार?

आंतरवालीतील घटनेच्या चौकशीला वेग येणार?

जालना, ४ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: जालन्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीमार आणि गोळीबार करण्यात आलाय या घटनेमुळे महाराष्ट्र हळहळला आणि पेटून उठला. या सगळ्या घटनेचे आज राज्यभर पडसाद उमटत आहेत. अशातच राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना आज जालन्यात येणार आहेत. संजय सक्सेना हे जालन्यात येऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. जालन्यात झालेल्या लाठीमारा प्रकरणी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक स्वतः चौकशी करणार आहेत. अतिरिक्त पोलीस महासंचालक जालन्यात घडलेल्या घटनेबाबत सविस्तर माहिती घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version