मोदी विरोधकांची आजपासून दोन दिवसीय बैठक

मोदी विरोधकांची आजपासून दोन दिवसीय बैठक

मुंबई, ३१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: मोदी विरोधकांच्या दोन दिवसीय बैठकीला आज गुरवारपासून सुरवात होत आहे. या बैठकीसाठी २८ राजकीय पक्ष एकवटले असून ६३ प्रतिनिधींसह ११ मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला मात देण्यासाठी ही बैठक होत आहे. मुंबईतील हयात हॉटेलमध्ये होणाऱ्या या बैठकीत आज महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. आजच्या या तिसऱ्या बैठकीत काय महत्वाचे निर्णय घेतले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. कालच्या मोदी विरोधकांच्या पत्रकार परिषदेतून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करण्यात आली.

आज आणि शुक्रवारी मोदी विरोधकांची बैठक होणार असून या बैठकीत संध्याकाळी ६ वाजता मोदी विरोधक पक्षाच्या लोगोचं अनावरणदेखील करण्यात येणार आहे. तसेच या बैठकीत मोदी विरोधक पक्षाचा संयोजक नियुक्त करण्याची शक्यताही आहे. या मुद्द्यावर महत्त्वाचा निर्णयदेखील घेतला जाणार आहे. मोदी विरोधक पक्षाच्या आघाडीत ताळमेळ राखला जावा म्हणून एक समितीही स्थापन केली जाणार आहे. तसेच जागा वाटपाची आणि भाजपाला घेरण्याचं राज्य पातळीवरील आणि देशपातळीवरील धोरण यावरही चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कालच्या पत्रकार परिषदेत कोणत्याही नेत्याने आजच्या बैठकीचा अजेंडा मांडला नसला तरी या बैठकीतील निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version