Dahi Handi Utsav 2026 : मुंबई, ठाण्यासह जागोजागी रंगणार दहीहंडीचा थरार; गोविंदा पथके सज्ज, सुरक्षेसाठी प्रशासनाचा विशेष बंदोबस्त

Dahi Handi Utsav 2026 : मुंबई, ठाण्यासह जागोजागी रंगणार दहीहंडीचा थरार; गोविंदा पथके सज्ज, सुरक्षेसाठी प्रशासनाचा विशेष बंदोबस्त

मुंबई : मुंबईत आज दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळणार आहे. शहरातील विविध भागांत मोठ्या दहीहंडी उत्सवांचे आयोजन करण्यात आले असून गोविंदा पथके मानवी मनोरे रचण्यासाठी सज्ज झाली आहेत. मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कल्याण या शहरांमध्ये प्रामुख्याने दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. जागोजागी उंचच्या उंच मनोरे रचून दही फोडण्याची स्पर्धा रंगते. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने काही नियम, अटी घालून दिल्या आहेत. तसेच गोविंदांसाठी काही उपाय योजनाही करण्यात आल्या आहेत. 

* दादर, वरळी, वांद्रे, घाटकोपरसह अनेक भागांत मोठ्या दहीहंडीचे आयोजन
* गोविंदा पथकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था
* गोविंदांना अपघाती रुग्णालयीन उपचारांसाठी 2 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण
* मृत्यू किंवा कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्वासाठी 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण
* मोठ्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून वाहतूक मार्गांमध्ये बदल आणि पर्यायी मार्गांची व्यवस्था
* गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर

हेही वाचा : Dahi Handi 2026 : जल्लोषात आणि आनंदात चैतन्याची फोडा हंडी, दहीहंडीच्या आपल्या प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा

मुंबई पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था –

* संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त
* दहीहंडीच्या ठिकाणी सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवण्याची व्यवस्था
* गोविंदा पथकांच्या सुरक्षेसाठी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथके तैनात
* मानवी मनोरे रचताना सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना
* गर्दी नियंत्रणासाठी बॅरिकेडिंग आणि प्रवेश-निर्गमनाचे स्वतंत्र मार्ग
* वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रमुख मार्गांवर वाहतूक पोलिसांची विशेष नियुक्ती आणि आवश्यकतेनुसार वाहतूक वळविण्याची व्यवस्था
* महिलांच्या सुरक्षेसाठीही विशेष पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version