Lalbaugcha Raja 2026 : बहुप्रतीक्षित लालबागचा राजा 2026 चा प्रथम दर्शन सोहळा संपन्न; बाप्पाचं भव्य रूप पाहण्यासाठी गणेशभक्तांची अलोट गर्दी

Lalbaugcha Raja 2026 : बहुप्रतीक्षित लालबागचा राजा 2026 चा प्रथम दर्शन सोहळा संपन्न; बाप्पाचं भव्य रूप पाहण्यासाठी गणेशभक्तांची अलोट गर्दी

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या गणेश मंडळांपैकी एक असलेल्या लालबागचा राजाची मुंबईकरांसह सर्वांनाच भुरळ असते. यावेळी राजाची मूर्ती कशी असेल, सजावट काय असेल, याची उत्सुकता भाविकांमध्ये होती. अखेर त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. लालबागच्या राजा मंडळाकडून अखेरीस राजाची पहिली झलक दाखवण्यात आली आहे. जगभरातील करोडो गणेशभक्तांचे आराध्य दैवत असलेल्या लालबागच्या राजाची पहिली झलक दाखवण्यात आली. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी प्रसारमाध्यमांसाठी लालबागच्या राजाचं फोटो सेशन आयोजित करण्यात येतं. यंदाही हा प्रथम दर्शन सोहळा दिमाखात पार पडला. हा सोहळा याची देहि याची डोळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक लालबागमध्ये उपस्थित होते. 

हेही वाचा : Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवासाठी खासगी बसने कोकणात जातायं?; बुकींग करण्यापूर्वी पाहा हे वाढीव दर, मगच करा बुकींग

यंदा लालबागचा राजाचा दरबार चांदीच्या नक्षिकामाने समजलेला आहे. तसंच मुख्य प्रवेशद्वार दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध मिनाक्षी मंदिराची प्रतिकृती निर्माण केली आहे  तर त्यावर महादेव शंकराची प्रतिमा बसवण्यात आली आहे. लालबागच्या राजाची सिंहासनाधिष्ट वात्सल्य मूर्ती पाहिल्यावर गणेशभक्तांच्या डोळे पाणावतात. गणेशोत्सवातील दहा दिवसांत जगभरातील करोडो भाविक लालबागच्या राजाचे दर्शन घेतात. लालबागच्या राजाच्या पहिल्या दर्शनाने आजपासूनच खऱ्याअर्थाने गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version