IIT Bombay Student Protest : वर्षभरात विद्यार्थ्यांनी जीवन संपवल्याची चौथी घटना, प्रशासनावर तीव्र नाराजी; IIT बॉम्बेच्या आंदोलनाचं नेमकं कारण काय?

IIT Bombay Student Protest : वर्षभरात विद्यार्थ्यांनी जीवन संपवल्याची चौथी घटना, प्रशासनावर तीव्र नाराजी; IIT बॉम्बेच्या आंदोलनाचं नेमकं कारण काय?

मुंबई : मुंबईतील पवई आयआयटी मुंबईमध्ये एका विद्यार्थीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाचे पडसाद शुक्रवारी, रात्री उशीरा आयआयटी परिसरात उमटल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार Btech चा एक विद्यार्थी परीक्षेमध्ये कॉपी करत असताना त्याला शिक्षकांनी पकडले. त्यानंतर तुझ्यावर कारवाई करू, असं त्याला सांगितण्यात आले. त्यानंतर तो होस्टेलमध्ये आला आणि त्याने संध्याकाळी आत्महत्या केली. यानंतर अनेक विद्यार्थी कॅम्पसमध्ये जमू लागले आणि त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.

हेही वाचा : Pune Accident : ब्रेक फेल झाला अन् काही क्षणांतच घडलं भयंकर; पहाटे नवले पुलाजवळ मोठा अपघात

आयआयटी पवई (आयआयटी बॉम्बे) मधील विद्यार्थ्यांकडून दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर रात्री उशिरा हे आंदोलन करण्यात आले. आंदोलन करणाऱ्या एका विद्यार्थ्याने प्रतिक्रिया दिली की, “मी आयआयटी बॉम्बेमध्ये इलेक्ट्रिकल शाखेत पदवी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाला शिकत आहे. आमच्या महाविद्यालयात एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यामुळे आम्ही आज आंदोलन करत आहोत. प्रशासनाकडून उत्तरदायित्व आणि पारदर्शकतेची मागणी करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. ही काही पहिलीच घटना नाही. या वर्षात अशा चार घटना घडल्या आहेत. त्यापैकी दोन तर केवळ गेल्या दोन महिन्यांतच घडल्या आहेत. हे का घडत आहे किंवा यामागील मूळ कारणे काय आहेत, याबद्दल आम्हाला काहीच कल्पना नाही. आम्हाला केवळ एवढेच हवे आहे की, डीन, संचालक आणि प्रशासनाने आम्हाला एक अहवाल द्यावा. ज्याद्वारे ते या प्रकरणाची दखल घेण्याचे, उत्तरदायित्व व पारदर्शकता सुनिश्चित करण्याचे आणि त्यांच्या कार्यकाळात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याची हमी देण्याचे आश्वासन देतील…”

तर दुसऱ्या एका आंदोलन विद्यार्थ्याने सांगितले की, “आम्ही सर्वजण अत्यंत दुःखी आहोत. ही घटना धक्कादायक आहे. तो आमच्यापैकीच एक होता आणि आता असं वाटतंय की आमचाच एक जण मागे राहिला आहे. कोणाची चूक आहे याबद्दल बोलायचं तर, मला नाही वाटत की अशावेळी आपण कोणाला दोष दिला पाहिजे… इथे ‘प्रशासन विरुद्ध विद्यार्थी’ अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण मला वाटतं की अशावेळी आपण नक्कीच एकत्र राहायला हवं.”

दरम्यान, आंदोलनस्थळी उपस्थित पोलीस उपायुक्त (DCP) दत्तात्रय नलावडे यांनी माहिती दिली की, “आज आयआयटी पवई येथे एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्यानंतर, काही आयआयटी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले. त्यांच्याशी चर्चा करून सामंजस्यपूर्ण तोडगा काढण्याचे प्रयत्न आयआयटी प्रशासनाकडून केले जात आहेत. पोलिसांनीही येथे सर्व आवश्यक व्यवस्था केली आहे. आत्महत्या केलेला विद्यार्थी बी.टेक.च्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version