नालासोपाऱ्यात पाणीपुरीच्या स्टॉलवर शौचालयाचे पाणी

नालासोपाऱ्यात पाणीपुरीच्या स्टॉलवर शौचालयाचे पाणी

पावसाळा सुरू असून रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाताना नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. नालासोपारा येथील पाणीपुरीच्या स्टॉलवर शौचालयाचे पाणी वापरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यापूर्वी बोरीवलीमधील ईडली-वडा स्टॉलवर असा प्रकार घडल्याचे उघडकीस आले होते.

नेमकं काय घडलं ?

नालासोपारा येथील पाणीपुरीच्या स्टॉलवर शौचालयाचे पाणी वापरत असल्याचे उघडकीस आले आहे.

यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी.

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चिखलेने माखलेल्या कॅनमध्ये शौचालयातून पाणी घेऊन जाताना दिसत आहेत.

मुंबईत अशा प्रकारच्या घटना अनेकदा घडत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होतो.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version