आरोग्य दिनानिमित्त ‘फिट महाराष्ट्रचे’ आयोजन

आरोग्य दिनानिमित्त ‘फिट महाराष्ट्रचे’ आयोजन

आज ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्य सरकारने ‘फिट महाराष्ट्र’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आरोग्य विभागाच्यावतीने ‘फिट महाराष्ट्र’ हा कार्यक्रम मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे पार पडला. निरोगी महाराष्ट्र हा या कार्यक्रमाचा संकल्प होता.

‘फिट महाराष्ट्र’ या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री अमित देशमुख, डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते.

निरोगी महाराष्ट्र बनवूया, कोरोना काळात लागलेल्या सवयी सुरू ठेवूया, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या क्रार्यक्रमादरम्यान केले. अजित पवार म्हणाले, वैयक्तिक आरोग्य, सामाजिक आरोग्य आणि देशाचे आरोग्य एकमेकांशी जोडलेले आहे. गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आले आहेत, मात्र तरी प्रत्येक नागरिकाने आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. कोरोना काळात अनेकांना घरी बसून काम करण्याची सवय लागली आहे. या सवयीमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रत्येकाने खेळ, व्यायाम नियमित केल्याने निरोगी राज्याचे स्पप्न पूर्ण होणार आहे. पर्यावरण रक्षणाच्या माध्यमातून, निरोगी राहण्याचे प्रयत्न करूया, असे आवाहन अजित पवार यांनी भाषणातून केले आहे. तसेच पुढच्या पिढीसाठी वसुंधरा आणि पर्यावरण यांचा विचार करणेही तितकेच गरजेचे असल्याचे ते म्हणाले. तर तंदुरस्त रहा, निरोगी रहा, आणि आयुष्य वाचवा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना केले आहे.

जागतिक आरोग्य दिन

१९५०साली जागतिक आरोग्य संघटनेने पहिला जागतिक आरोग्य दिन साजरा केला होता. त्यानंतर दरवर्षी ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. जगभरातील लोकांच्या सामान्य आरोग्य आणि कल्याण, तसेच मानसिक आणि शारीरिक आरोग्याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version