नवी मुंबई पोलिसांची गुटखा विरोधात कारवाई

नवी मुंबई पोलिसांची गुटखा विरोधात कारवाई

नवी मुंबईत ‘नशा मुक्त नवी मुंबई’ अभियान राबवण्यात येत आहे. या दरम्यान नवी मुंबई पोलिसांनी गुटखा विरोधात मोठी कारवाई केली आहे. नवी मुंबई पोलिसांनी ६० लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नशा मुक्त नवी मुंबई या अभियानाला नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. गुप्तचराकडून माहिती मिळताच, पोलिसांनी सापळा रचत ४ टेम्पो आमि एका गोदामावर धाड टाकली. यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात विमल कंपनीचा गुटख्याचा साठा हाती लागला. तसेच यावेळी अन्न  आणि औषध प्रशासन विभागाला पाचारण करण्यात आले.

नवी मुंबई पोलिसांनी धाड टाकत ४२ लाख ७२ हजार किंमतीचा विमल कंपनीचा गुटखा आणि गुटख्याची वाहतूक करण्यासाठी असलेल्या ४ टेम्पोमधील साठा असा एकूण ६० लाख ७२ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी अवैध गुटखा विक्रीप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी ७ आरोपींना अटक केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version