मंगळ ग्रह पूर्णपणे लाल रंगाचा नाही, NASA चा दावा…

मंगळ ग्रह पूर्णपणे लाल रंगाचा नाही, NASA चा दावा…

अमेरिकन अंतराळ एजन्सी नासा(NASA)ने मंगळ ग्रहाविषयी एक नवीन दावा केला आहे. नासाने काही मंगळ ग्रहाचे फोटो जारी केले आहेत. यात निळ्या रंगाच्या बर्फाच्या डोंगरांचे आणि पिवळ्या रंगाचे धुळीचे थर बर्फाचे परिसर दिसत आहे. शिवाय हे फोटो
नासाने मार्स ऑर्बिटर ओडिसीचे अंतराळात २० वर्षे पूर्ण होण्यानिमित्ताने शेअर केले आहे. हे फोटो मार्स ऑर्बिटर ओडिसीने घेतले असून मंगळ ग्रहाचा अभ्यास करून लवकरच मनुष्य या ग्रहावर वास्तव्य करू शकेल का? अशा अनेक गोष्टी यात बघतल्या जाणार आहे.

या फोटोंवरून हे स्पष्ट झाली की, मंगळ ग्रह पूर्ण लाल नाही. नासा जारी केलेल्या फोटोमध्ये एकीकडे पिवळ्या रंगाचे वाळूचे डोंगर तर दुसरीकडे बर्फाने झाकलेला एक मोठा खड्डा आहे. तसेच बर्फाचं मैदान निळ्या रंगाचं दिसत आहे. म्हणजे मंगळ ग्रहावर मोठ्या प्रमाणात बर्फ असल्याच स्पष्ट होतं आहे. मार्स ऑर्बिटर ओडिसी मंगळ ग्रहावर बऱ्याच वर्षांपासून काम करत आहे. NASA ने हे फोटो मंगळ ग्रहाच्या उत्तर ध्रुवाजवळ घेतले आहेत. जे फोटो नासाने जारी केला आहे यात साधारण ३० किलोमीटर रूंद भाग दिसत आहे. २००२ पासून २००४ पर्यंत अनेक फोटो काढण्यात आले आहे.

मंगळ या ग्रहाविषयी काही माहीती ही नासाने त्याच्या ऑफिशियल साईडवर दिली आहे. मार्स ऑर्बिटर ओडिसीला ७ एप्रिल २००१ ला मंगळ ग्रहासाठी रवाना करण्यात आलं होतं. फ्लोरिडाच्या केप केनवरल एअरफोर्स स्टेशनहून लॉन्च झाल्यानंतर हे २४ ऑक्टोबर २००१ ला मंगळ ग्रहाच्या ऑर्बिटमद्ये पोहोचलं. तेव्हापासून हा ऑर्बिटरने मंगळवरील हजारो फोटो पाठवले आहेत. या फोटोच्या सह्याने वैज्ञानिक मंगळवरील वातावरणाचा सखोल अभ्यास करत आहेत.

मंगळ ग्रहाचा जे फोटो जारी झाला आहेत त्यात निळ्या रंगाचा परिसर बर्फाने झाकलेला आहे. तर पिवळ्या रंगाचे जे भाग दिसत आहे ते सूर्याच्या प्रकाशात चमकणारे उष्ण भाग आहेत. हा फोटो मार्स ऑर्बिटर ओडिसीच्या थर्मल इमिशन इमेजिंग सिस्टीम इन्स्ट्रूमेंटने घेतला होता. त्यानंतर याला फॉल्स कलर इमेजमध्ये बदललं. मंगळ ग्रहावरून सतत वेगवेगळे फोटो येत असतात. ज्यात वेगवेगळे रंग दिसत असतात. या ग्रहावर सर्व रंग आहेत जे कोणत्याही ग्रहाला सुंदर बनवतात. नुकताच नासाच्या मार्स पर्सिवरेंसने मंगळ ग्रहावर एक हिरव्या रंगाचा चमकदार दगड पाहिला होता. ज्यानंतर पर्सिवरेंस रोवरने आपल्या ट्विटर हॅंडलवर लिहिले होते की, इंजीन्यूटी हेलिकॉप्टरला मंगळ ग्रहावर हिरव्या रंगाचा दगड दिसला. त्याचे फोटो रोवरवरील कॅमेराने घेतले आहेत. सध्या याचा अभ्यास सुरू आहे. असं त्यांनी सांगितलं होतं. मंगळ ग्रहविषयी आणखी माहिती समोर येतील यासाठी वाट बघावी लागणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version