मुंबईत हॉट एअर बलून आणि पतंग उडवण्यास बंदी

मुंबईत हॉट एअर बलून आणि पतंग उडवण्यास बंदी

मुंबई, २ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबईत छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, जुहू एअरोड्रोम, नौदलाचा हवाई तळ, आयएनएस शिक्रा तसेच या सर्व ठिकाणांच्या भोवताचा परिसर, विमानांसाठीच्या धावपट्ट्या या सर्व परिसरांमध्ये फुगे, हॉट एअर बलून, ड्रोन, उंच उडणारे फटाके, प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या वस्तू, पतंग, पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, मायक्रोलाईट एअरक्राफ्ट यांना २१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत वापरण्यास आणि उडवण्यास बंदी आहे. विमानांच्या मार्गात कोणत्याही प्रकारे अडथळे निर्माण करण्यास बंदी आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार पोलीस कारवाई होणार आहे. सुरक्षेसाठी हा खबरदारीचा उपाय करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version