हर्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात शनिवारी 30 मे आणि रविवारी 31 मे रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकदरम्यान काही लोकल गाड्या रद्द तर, काही उशिराने धावण्याची शक्यता आहे. यावेळी पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट-मुंबई सेंट्रल दरम्यानची लोकल सेवा बंद असणार आहे. तसेच मध्य रेल्वेच्या मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड या स्थानकांवरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. हे देखभाल व दुरुस्तीचे मेगा ब्लॉक रेल्वेतील पायाभूत सुविधांच्या देखरेख व सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक असून यादरम्यान प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे या स्थानकातील प्रवाशांना पर्यायी मार्गाने इतर स्थानकांतून इच्छित स्थळी प्रवास करावा लागणार आहे. प्रवाशांनी या बदलांची नोंद घ्यावी आणि त्यानुसारच त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वे
कुठेः मरिन लाइन्स स्थानकादरम्यान सर्व मार्गिकावर
कधी : शनिवारी रात्री 1.15 ते पहाटे 4.15 दरम्यान
परिणाम : मरिन लाईन्स स्थानकात फलाट क्र. 3 आणि 4 दरम्यान रोड क्रेनद्वारे पादचारी पुलाच्या तुळई उभारण्यात येणार आहेत. ब्लॉकमुळे काही लोकल अंशतः रद्द आणि काही लोकल सेवा पूर्णतः रद्द करण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.
मध्य रेल्वे
कुठे : सीएसएमटी-विद्याविहार, अप-डाऊन धीमा मार्ग
कधी : सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत
परिणाम : सीएसएमटीहून सकाळी 10.48 ते दुपारी 3.45 दरम्यान सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सीएसएमटी-विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर मार्ग
मार्ग कुठेः कुर्ला-वाशी, अप-डाऊन
कधी : सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत , रविवारी
परिणाम : सीएसएमटीहून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 दरम्यान वाशी, बेलापूर, पनवेलला जाणाऱ्या डाऊन लोकल आणि पनवेल, बेलापूर, वाशीहून सकाळी 10.17 ते दुपारी 3.47 दरम्यान सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप लोकल सेवा रद्द असणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.