आज हिवाळी अधिवेशाचा पहिला दिवस पार पडला. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. महाविकास आघाडी सरकार हे भेदरलेले सरकार असल्याचा आरोप फडणविसांनी केला आहे. तसेच राजा उदार झाला अन् हाती भोपळा आला, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. दरम्यान यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न तसेच भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्याच्या मुद्द्यावर भाष्य केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडी सरकारवर नियम बदलण्याची नामुष्की असून आमदारांवर विश्वास नसलेले हे सरकार असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. तसेच यावेळी राज्य सरकारने शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई दिलेली नसल्याचा आरोपही फडणवीसांनी केला आहे. सरकारने शेतकऱ्यांचे पंचनामे न करता त्यांना नुकसान भरपाईसुद्धा दिली नसल्याचे ते म्हणाले.
तसेच सभागृहात भास्कर जाधव यांनी केलेले वक्तव्य आक्षेपार्ह आणि लज्जास्पद असल्याचे फडणवीस म्हणाले. भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे भास्करांनी माफी मागण्याची मागणी फडणवीसांनी केली. त्यानंतर भास्करांनी माफी सभागृहात बिनशर्त माफी मागितली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केलेला अवमान सहन केला जाणार नाही, असेही ते म्हणाले.
आमच्या काळात आम्ही ११ हजार कोटी रुपणेय वीजमंडळाला दिले होते. मात्र महाविकास आघाडी सरकार वसूली करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची वीज कापण्याबाबत आम्ही उद्याही आवाज उठवू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.