नवी मुंबई : नवी मुंबईतील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधलेल्या घरांचे बांधकाम हे सीआरझेड आणि खारफुटीच्या बफर झोनचे उल्लंघन करून बांधल्याच्या पर्यावरणवाद्यांच्या तक्रारीवर महाराष्ट्र सागर किनारा प्राधिकरणाने अर्थात सीआरझेडने रायगड जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे निर्देश दिले आहेत.
या योजनेतील मानसरोवर आणि खारघरची बांधकामे खारफुटी आणि आंतर-भरती-ओहोटीच्या पाणथळ प्रदेशात बांधल्याची तक्रार नॅटकनेक्ट फाउंडेशनने पंतप्रधान कार्यालयाकडे केली होती. त्यानुसार ती पुढील कार्यवाहीसाठी पंतप्रधान कार्यालयाने केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे संचालक अरविंद कुमार अग्रवाल यांच्याकडे पाठवून चौकशीचे निर्देश दिले होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.