‘कर्मचाऱ्यांनी कायदा हातात घेणं योग्य नाही’ – अनिल परब

‘कर्मचाऱ्यांनी कायदा हातात घेणं योग्य नाही’ – अनिल परब

न्यायालयाच्या निर्णयानंतर एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी थेट मोर्चा काढला. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत शरद पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संपकारी कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे कायदा हातात घेणं योग्य नसल्याचे अनिल परब म्हणाले. ते म्हणाले, हल्ला केल्याने कुणाच्या हाती काहीही लागणार नाही. आम्ही चर्चेसाठी तयार असल्याची भूमिका आधीपासूनच मांडली असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन करत कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत सेवेत रुजू होण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, आज पवारांच्या घरासमोर झालेल्या आंदोलनातील दोषींवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचा इशाराही अनिल परब यांनी दिला आहे.

आंदोलनानंतर पवारांची प्रतिक्रिया

आंदोलनानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले, मी एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यांना आधार देणे गरजेचे आहे. परंतु चुकीच्या नेतृत्त्वाच्या पाठीश नाही. तसेच राजकारणात संघर्ष असताना टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्राची नाही. एसटी कर्मचारी आणि माझा घनिष्ठ संबंध असून त्यांचे एकही अधिवेशन माझ्याकडून सुटले नसल्याचेही पवार म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version