राहुल गांधीना केंद्रीय निवडणूक आयोगाची नोटीस

राहुल गांधीना केंद्रीय निवडणूक आयोगाची नोटीस

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने राहुल गांधींना नोटील बजावली आहे. रेप इन इंडिया या वक्तव्यावरुन निवडणूक आयोगाने राहुल गांधींकडून स्पष्टीकरण मागीतले आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधीनी केलेल्या वक्तव्यावरुन निवडणूक आयोगात ही तक्रार केली आहे.

नक्की काय म्हणाले होते राहुल गांधी ?

‘मेक इन इंडिया’ हे ‘रेप इन इंडिया’ बनले आहे. अशा शब्दात राहुल गांधींनी देशातील वाढत्या बलात्कारांच्या घटनेवरुन मोदींना टार्गेट केले होते.

राहुल गांधींच्या या वक्तव्यावरुन लोकसभेत एकच गोंधळ पाहायला मिळाला. राहुल गांधींनी या वक्तव्यावरुन माफी मागायला हवी, अशी मागणी करण्यात आली होती.

या मागणीवर राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिले. मी माफी मागणार नाही. माझं नाव राहुल गांधी आहे, राहुल सावरकर नाही, असे राहुल गांधी म्हणाले होते.

राहुल गांधींच्या या विधानाचं देशभरात भाजपकडून तीव्र निषेध केला जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version