‘मविआत सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय होतात’ – दिलीप वळसे-पाटील

‘मविआत सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय होतात’ – दिलीप वळसे-पाटील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहविभागावर नाराज असल्याच्या बातम्या समाज माध्यमांवर येत होत्या. दरम्यान, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यात वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अफवा पसरवणाऱ्या बातम्यांचे खंडन केले आहे. या भेटीनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शासकीय कामकाजाबाबत चर्चा झाली असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय होतात. आज सायंकाळी ६ वाजता पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. तसेच संजय राऊत यांची भावना योग्य आहे. गृहविभागाकडून कुठली कमतरता होत असेल तर त्याबाबत सुधारणा करू, असेही ते म्हणाले.

शिवसेना नेते चंद्रकांत खैर यांनी गृह विभाग मुख्यमंत्र्यांकडे असावा अशी मागणी केली होती. तसेच मुख्यमंत्री गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या बातम्या पुढे येत होत्या. या बातम्यांचे मुख्यमंत्र्यांनी खंडन केले आहे. ते म्हणाले, अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास्त करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे, आणि ते उत्तम काम करीत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version