Dahi Handi In Mumbai Local Train: मुंबईत चक्क धावत्या लोकलमध्ये महिला प्रवाशांनी फोडली हंडी, व्हिडीओ व्हायरल

Women Celebrate Dahi Handi: मुंबई लोकल ट्रेन म्हणताच गर्दी, ताण-तणाव, भांडण व हाणामाऱ्या यांचं दृश्य आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. परंतु हा विचार महिला प्रवाशांनी खोडून काढला आहे.
Dahi Handi In Mumbai Local Train: मुंबईत चक्क धावत्या लोकलमध्ये महिला प्रवाशांनी फोडली हंडी,  व्हिडीओ व्हायरल

Women Celebrate Dahi Handi: मुंबई लोकल ट्रेन म्हणताच गर्दी, ताण-तणाव, भांडण व हाणामाऱ्या यांचं दृश्य आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. परंतु हा विचार महिला प्रवाशांनी खोडून काढला आहे, भजन-कीर्तनांसोबतच आता गोपाळकाला देखील लोकल डब्यात साजरा केला जाऊ शकतो हे दाखवून दिले. यात त्यांनी ट्रेनमधील महिला डब्याची फुगे, पताके लावून आकर्षक सजावट केली. हँडल्सच्या साहाय्याने छोटीशी हंडी बांधली, ज्यात फुलांचा समावेश होता.

 

हा प्रकार बदलापूर ते ठाणे दरम्यान धावणाऱ्या सकाळी 7:56 च्या लोकल ट्रेनमधील असल्याचे सांगितले जात आहे. यात सजावटीबरोबर गोविंदाची गाणी लावून त्यावर नाचत जल्लोष देखील केला.  त्यानंतर या महिलांनी एक थराचा मानवी मनोरा रचत छान अशी दहीहंडी फोडली. या सुंदरशा मुंबई लोकलमधील साजरा केलेला गोपाळकालाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा –  Ambernath Video Viral : समोरून ट्रेन आली, तरी जीव मुठीत घेऊन ट्रॅकवर उतरला! दिव्यांग व्यक्तीचा जीव धोक्यात घालणारा प्रकार

रोजच्या दगदगीच्या जीवनात उत्सवाचे क्षण साजरे करण्यासाठी जागा आणि वेळ यांची कोणतीच मर्यादा नसते, हे या महिलांनी दाखवून दिले. काल जागोजागी दहीहंडीनिमित्त मानवी मनोऱ्यांचे कडक 7, 8 व 9 ते 10 थर यशस्वीरीत्या रचले गेले. याबरोबरच धावत्या लोकलमध्ये देखील महिलांनी मोठ्या उत्साहात अशी वेगळ्याप्रकारे दहीहंडी हा सण साजरा केला. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version