वडाळा येथील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशन (सीजीएस) ला होणारा गॅस पुरवठा बंद झाला. ज्यामुळे शहरातील सीएनजीच्या उपलब्धतेवर परिणाम झाला. यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सीएनजी पुरवठा पूर्णपणे बंद झाल्यामुळे रिक्षा, टॅक्सी आणि बससेवा ठप्प झाल्या आहेत. ज्याच्या परिणाम सर्वसामान्यांवर, नोकरदारांवर आणि शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर होत आहे.
कारण रिक्षा, टॅक्सी आणि बसला आवश्यक गॅस उपलब्ध न झाल्याने कोणतीही वाहनसेवा वेळेवर येत नाही, यामुळे सर्वसामान्यांना, नोकरदारांना आणि शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आरसीएफ (नॅशनल केमिकल्स अँड फर्टिलायझर्स) परिसरात गेलच्या मुख्य गॅस पाइपलाइनचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा- CNG Shortage in Mumbai : मुंबईत सीएनजी पुरवठा कोलमडला; रिक्षा, टॅक्सी सेवा गडबडली
यामुळे वडाळा येथील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशन (सीजीएस) ला गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सीएनजी पुरवठा ठप्प झाला. शहराचा मोठा भाग सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांवर अवलंबून आहे. यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक सेवा कोलमडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
सध्या गेल आणि एमजीएल प्रशासन बिघाड दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. महानगर गॅस लिमिटेडने मंगळवारपर्यंत सीएनजी पुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान सध्या स्थितीला मुंबईतील मोजक्या पंपांवर सीएनजी भरण्यासाठी खाजगी वाहने आणि टॅक्सींच्या दोन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सीएनजी पुरवठा पूर्ववत होईपर्यंत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकरांना आणखी काही काळ त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.