62nd Maharashtra State Marathi Film Awards : ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ लेखक-पटकथाकार सलीम खान यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

62nd Maharashtra State Marathi Film Awards : ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ लेखक-पटकथाकार सलीम खान यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ६२ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा आज, बुधवारी मुंबईत पार पडला. प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिरात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे, यावेळी  कै. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2025 ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांना प्रदान करण्यात आला. तर स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2025 ज्येष्ठ लेखक आणि पटकथाकार सलीम खान यांना देऊन गौरवण्यात आले. काही कारणास्तव सलीम खान या सोहळ्या अनुपस्थित राहिल्याने ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांनी हा पुरस्कार त्यांच्यावतीने स्विकारला. याशिवाय  कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेता प्रसाद ओक यांना, तर स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना प्रदान करण्यात आला. हे पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आले. 

हेही वाचा : Sujay Vikhe Patil : महायुतीत वादाची ठिणगी; राष्ट्रवादीच्या नेत्यावर भाजपच्या माजी खासदाराने साधला निशाणा; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांनी सर्वांची बाजू ऐकून…'

या पुरस्कार सोहळ्याला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. अभिनेत्री राणी मुखर्जी यांना स्व. राज कपूर पुरस्कार दिल्यानंतर त्यांनी मराठी भाषेमधून आभार मानले. ज्येष्ठ संगीतकार हृदयानाथ मंगेशकर यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रधान करण्यात आले असता यावेळेस त्यांच्या पत्नी आणि सुपुत्र उपस्थित होते. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version