मुंबईच्या ‘ट्रॉमा केअर’ची रुग्णसेवा रामभरोसे !

मुंबईच्या ‘ट्रॉमा केअर’ची रुग्णसेवा रामभरोसे !

मुंबई, ३० मार्च २०२४, प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेच्या जोगेश्वरी पूर्व येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअरची रुग्णसेवा अनेक महिन्यांपासून रामभरोसे सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते बीमेष मुतुला यांनी केला आहे. रुग्णालयातील औषध विभाग आणि अतिदक्षता विभागातील वरिष्ठ डॉक्टर हे मागील अनेक दिवसांपासून गायब आहेत. यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर कनिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार सुरू आहेत. महापालिकेने या रुग्णालयात खासगी कंपनीच्या माध्यमातून डॉक्टरांची नेमणूक केली होती. मात्र वेळेवर पगार मिळत नव्हता म्हणून डॉक्टर नोकऱ्या सोडून निघून गेले होते. याचा फटका रुग्णांना बसत आहे. काही रुग्णांचा बळी गेला आहे. या प्रकरणी महापालिकेने डॉक्टरांची नेमणूक करणाऱ्या कंपनीविरोधात पोलिसांत तक्रार करावी अशी मागणी बीमेष मुतुला यांनी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version