पेटीएम बँकेवर कारवाई

पेटीएम बँकेवर कारवाई

मुंबई, ३१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : बँकिंग संदर्भातल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने पेटीएम बँकेवर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे २९ फेब्रुवारी २०२४ नंतर पेटीएम बँकेद्वारे आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. ज्यांचे आधीपासून पेटीएम बँकेत खाते आहे त्यांना संबंधित खात्यातील पैसे २९ फेब्रुवारीच्या आधी दुसऱ्या खात्यात जमा करून नंतर त्या दुसऱ्या खात्यातून आर्थिक व्यवहार करता येतील. पेटीएम बँकेतील खात्याचा वापर २९ फेब्रुवारी २०२४ नंतर आर्थिक व्यवहारासाठी करता येणार नाही. पेटीएम बँकेद्वारे २९ फेब्रुवारी २०२४ नंतर फास्टटॅग सेवा तसेच इतर कोणत्याही आर्थिक सेवेचा वापर करता येणार नाही. पेटीएम बँकेची कर्ज पुरवठा करणारी सेवा पण २९ फेब्रुवारी २०२४ नंतर बंद होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version