मुंबई, ०२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: भाईंदर मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी एका अस्वच्छ पुऱ्या बनविणाऱ्या कारखान्यावर धाड टाकून तिथल्या अस्वच्छ परिस्थितीचा पर्दाफाश केला आहे. भाईंदर पश्चिमेच्या आझाद नगर भागात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारा पुऱ्या बनवणाऱ्या कारखान्याची माहिती मनसे कार्यकर्त्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे हा कारखाना शोधून तिथे मनसे कार्यकर्त्यांनी धाड टाकली असता तेथील कामगार अस्वच्छ आणि अर्धनग्न अवस्थेत पायाने पीठ मळताना दिसून आले. शिवाय यात कमालीची अस्वच्छता या ठिकाणी दिसून आली. यात काही बालकामगारही आढळून आले. कोणालाही किळस येईल असा प्रकार येथे सुरु होता. मनसे कार्यकर्त्यांनी याबाबतची तक्रार अन्न आणि औषध प्रशासनाला केल्यानंतर प्रशासनाने हा कारखाना सील केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.