गोरेगावमधील इमारतीच्या वाहनतळात अग्नितांडव

गोरेगावमधील इमारतीच्या वाहनतळात अग्नितांडव

मुंबई, ६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली. या भीषण आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर १४ जण जखमी झालेत. तर ३० जणांची सुटका करण्यात आली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून, सध्या कुलिंगचं काम सुरु आहे. आगीचे कारण अद्याप समोर आले आहे. या आगीमुळं नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक याचा तपास करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version