‘वक्फ बोर्डच्या माध्यमातून ११ तक्रारी दाखल’ – नवाब मलिक

‘वक्फ बोर्डच्या माध्यमातून ११ तक्रारी दाखल’ – नवाब मलिक

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील मंदिर आणि मशिदीच्या जमीन घोटाळाप्रकरणी महिती दिली आहे. यावेळी वक्फ बोर्डच्या माध्यमातून ११ तक्रारी दाखल करण्यात आल्या असल्याची माहिती नवाब मलिकांनी दिली. तसेच वक्फ बोर्डच्या छापेमारीची ईडीने बातमी फिरवली असल्याचा आरोपही मलिकांनी केला आहे.

वक्फ बोर्डच्या माध्यमातून ११ तक्रारी दाखल करण्यात आली असल्याची माहिती नवाब मलिकांनी दिली आहे. यामध्ये नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, बदलापूर, पुणे आणि बीडमध्ये हे या तक्रारी दाखल झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दहा देवस्थानांपैकी तीन मुस्लिम आणि सात हिंदू देवस्थानांमध्ये जमीन घोटाळा झाल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे ईडीने देवस्थानांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नवाब मलिकांनी केली आहे.

नवाब मलिक म्हणाले, जमीन घोटाळ्यात वक्फ बोर्डची एकूण २१३ एकर जमीन हडप करण्यात आली आहे. यामध्ये मशीद इनाम ६० एकर, रुई नलकोल १०३ एकर, नवीन निमगाव मशीद ईनाम ५० एकर आणि मशीद, दर्गा इनाम अशा २१३ एकर जमिनीचा समावेश आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version