UPS Pension Rules 2026: आता ‘या’ कर्मचाऱ्यांची दिवाळी, मासिक पेन्शनबाबत महत्त्वाची अपडेट समोर

UPS PENSION RULES 2026

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी आधीच आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे मंत्रालयाने NPS मधील कर्मचाऱ्यांसाठी नवीन युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) चे नियम जाहीर केले आहेत.या योजनेत कोण पात्र असेल, किती पैसे जमा करावे लागतील आणि पेन्शन किती मिळेल, याची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात

UPS मध्ये काय मिळणार?
1. 10 वर्षे नोकरी पूर्ण केल्यावर किमान 10,000 रुपये महिना पेन्शन मिळणार.
2. 25 वर्षे सेवा केल्यावर पूर्ण पेन्शनचा लाभ मिळेल.
3. 20 वर्षांनंतर हवे असल्यास स्वेच्छा निवृत्ती (VRS) घेता येणार.

ही योजना केंद्र सरकारने 1 एप्रिल 2025 पासून सुरू केली असून, आता रेल्वेतही लागू करण्यात आली आहे.

कोण पात्र असणार?
1 जानेवारी 2004 नंतर भरती झालेले आणि NPS मध्ये असलेले रेल्वे कर्मचारी या योजनेसाठी पात्र आहेत. मात्र, कॅज्युअल, रोजंदारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही.

EPFO Rules 2026: नोकरदारांसाठी मोठी खूशखबर! EPFO कडून 9 महिन्यांत 7 मोठे बदल; पहा नेमकं काय बदललं?

पैसे किती भरावे लागणार?
कर्मचाऱ्याला दरमहा मूळ पगार + DA च्या 10% रक्कम स्वतः भरावी लागेल आणि तेवढेच 10% योगदान रेल्वे प्रशासनही देणार आहे. कर्मचारी रजेवर किंवा दुसऱ्या विभागात प्रतिनियुक्तीवर असला तरी योगदान सुरूच राहील

कुटुंबालाही लाभ
कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या जोडीदाराला 60% फॅमिली पेन्शन मिळेल आणि पेन्शनवर महागाई भत्ता (DR) सुद्धा लागू असेल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version