Peper Leak Row : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अर्थात एमएपीएसचीच्या पेपरफुटी प्रकरणावरुन सध्या राजकीय चर्चा सुरु आहे. या प्रकरणात शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पूर्णच दोषी ठरवणे चुकीचे असल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलेले आहे. एमपीएससी ही स्वतंत्र आणि स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे पेपरफुटीचा थेट संबंध हा शिक्षणमंत्र्यांशी जोडणे हे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
काय म्हणाले योगेश कदम?
योगेश कदम यांनी धाराशिव येथे पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. पेपरफुटीच्या प्रकरणानंतर त्यांचा राजीनामा घेणे हा कोणताही उपाय नाही. त्याजागी एमएपीएसच्या सध्या असलेल्या व्यवस्थेत आवश्यक बदल करण्याची खरी गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
एमएपीएसची असलेले अध्यक्ष, सचिव आणि उपसचिव या महत्त्वाच्या असलेल्या पदांवर मंत्रालयीन कॅडरमधील अधिकाऱ्यांऐवजी वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यंमंत्र्यांकडे करण्यात आली आहे शिवाय आयोगाच्या सुरक्षेवर तसेच कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी IPS दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असेही त्यांनी सुचवले आहे.
पूर्वी विठ्ठल मोरे कार्यरत असताना आयोगाचे असलेले कामकाज पारदर्शक पद्धतीने झाले होते आणि महत्त्वाचे म्हणजे पेपरफुटीसारख्या घटनाही घडल्या नाहीत, असे योगेश कदम यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे एमपीएसचीची परीक्षा लाखो विद्यार्थी देत असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करुन परीक्षा प्रक्रिया ही पारदर्शक करणे अत्यंत गरजेचे आहे असेही योगेश कदम यांनी म्हटले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.